मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायकीय फटाके फुटत आहेत. अशातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ‘ते रोज लवंग्या फोडत आहेत, दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील’, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.
दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील. निश्चितपणे मला याबाबत माहिती नाही. पण शनिवारी 26/11 आणि 93 ब्लास्टचे फटाके फुटणार, असा दावा लाड यांनी केला आहे. जर टीव्हीवर फुटेज मिळालं असेल तर राज्य सरकारनं कारवाई करावी. मला, दरेकर, गिरीश महाजन, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या सगळ्यांना राज्य सरकार त्रास देत आहे. ते आम्हाला सोडत नाहीत, चौकशी सुरु आहे. राज्य सरकार यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा गंभीर आरोप लाड यांनी केलाय. फटाक्यांचा दारुगोळा फटाके फुटल्यानंतर समजतो. देवेंद्र फडणवीस मोठा फटाका फोडणार तेव्हा कळेल की घात घोतो की अपघात, असा सूचक इशाराही प्रसाद लाड यांनी दिला आहे.
संजय राऊत चौथ्यांदा खासदार झालेत. त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत, असा टोला लाड यांनी लगावला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पात 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबतचं एक पत्र त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पाठवलं होतं. त्यावेळी राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या कंपनीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट २०२४ साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं’
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
- भाजप नेत्याची दादागिरी; काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळू दिला नाही म्हणून हवालदाराच्या लगावली कानशिलात
- द्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

