🕒 1 min read
मुंबई : दादरा नगर हवेलीमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने दिवाळीला सीमोल्लंघन करत दादरा नगर हवेलीत भगवा फडकविला. त्याचबरोबर भाजपच्या जीवावर शिवसेनेचे आमदार निवडून आल्याचं भाजपकडून बोललं जात होतं. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आजच्या सामनातून भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. आणि शिवसेना भाजपच्या जीवावर नाही तर स्वबळावर जिंकल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.
एक निवडणूक काय जिंकलीय शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. संजय राऊत तर कोटही शिवून बसले असतील, असा चिमटाही आशिष शेलार यांनी काढला.
शिवसेनेने हुकूमशाहीबद्दल बोलावं म्हणजे दिवसाढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतो याचं वर्णन करण्यासारखं आहे. ते एक निवडणूक जिंकले. पण संपूर्ण देशात आम्हाला मोठं आव्हान उभं केलं, किंबहुना स्वप्नात पंतप्रधान बनण्याचीही स्वप्ने पडत असतील, मंत्रीमंडळाची रचनाही केली असेल, खातेवापटही केलं असेल, राऊत साहेब कोट शिवूनही बसले असतील. त्यामुळे तुमच्या स्वप्न रंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत- प्रसाद लाड
- ‘पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट २०२४ साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं’
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
- भाजप नेत्याची दादागिरी; काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळू दिला नाही म्हणून हवालदाराच्या लगावली कानशिलात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
