🕒 1 min read
मुंबई : भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठा श्रेयवाद रंगला तो म्हणजे चिपी विमानतळाचा. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंच्यातील वाद शिगेला पोहचला होता. एका मंचावर असूनही दोन्ही नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य करणं चुकवलं नाही. असाच सेना-भाजपचा वाद चिघळल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याच्या आधीच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात श्रेयवादावरुन राजकारण पेटले आहे.
अनेक वर्षांपासून कल्याण पूर्वेला बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची मागणी नागरिकांकडून केली जात होती. महापालिकेच्या ड प्रभाग समितीच्या जवळ असलेल्या उद्यानाची 8000 चौरस मीटर जागा आहे. त्याच जागेत 1300 चौरस मीटर जागेत स्मारक उभे करण्याची मागणी केली जात होती. मात्र, या जागेवर आरक्षण असल्याने स्मारक उभे कसे राहणार असा प्रश्न होता. हे आरक्षण आता बदलण्यात आले असून त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
स्मारकाच्या कामाचा डीपीआर तयार करुन लवकर निविदा काढली जाईल. स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार आहे. आरक्षण बदल आणि निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे स्मारक उभे राहत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. तर स्मारकासाठी राज्य सरकारकडून जी परवानगी हवी होती. ती मी आणून दिली आणि सातत्याने पाठपुरावा केला, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार
- ‘शिवसेनेनं एक निवडणूक काय जिंकली, लगेच पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय
- त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत- प्रसाद लाड
- ‘पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट २०२४ साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं’
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
