Share

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, म्हणून पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे. आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फक्त ५ रुपयांनी पेट्रोल दर कमी करून काय होणार? असा सवाल करत किमान २५ रुपयांनी तरी दर कमी करायला हवे होते.अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले.असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच जर भाजपचा पूर्ण पराभव झाला, तर पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. लोक पेट्रोल पंपावर १५ ते २० रुपयांचे पेट्रोल भरतात आणि समोर लागलेल्या मोदींच्या फोटोतून म्हटले जाते, आम्हाला मतदान दिल्याची किंमत चुकवा. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच राज्यात पेट्रोल दरकपातीवर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डीजेल भाववाढ करून केंद्राने १२७ लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. मात्र हे दिवस २०२४ साली जातील असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!