🕒 1 min read
मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर काही जणांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणावरून सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, आता समीर वानखेडे मुस्लीमच आहेत असा दावा NCB चे समीर वानखेडे यांचा पहिला निकाह (लग्न) लावून देणाऱ्या काझीने केला आहे.
मलिक यांनी आज समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशीसोबतच्या विवाहाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तसेच त्या लग्नाचा ‘निकाह नामा’ देखील त्यांनी प्रसिद्द केला आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांचा पहिला निकाह (लग्न) लावून देणाऱ्या काझी मुज्जमिल अहमद यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
समीर वानखेडे खोटं बोलत आहेत. पहिल्या पत्नीशी लग्न करताना मी त्यांचा निकाह लावून दिला होता. त्यांच्या निकाहच्या वेळी २ हजार लोकं उपस्थित होते. तसेच संपूर्ण वानखेडे कुटुंबीय मुस्लीम आहेत अशी माहिती काझींनी दिली. जर ते मुस्लीम नसते तर त्यांचा निकाहच लावता आला नसता. त्यांच्या निकाहावेळी २ हजार जणांना दावत दिल्याचाही दावा काझींनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- रेल्वेत प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक
- ‘मी गुन्हा केला नाही’, नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे उत्तर

