मुंबई : क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. तसेच आज समीर वानखेडे यांच्या लग्नाचा निकाहनामा प्रसिद्ध केला आहे. यावर आता समीर वानखेडे प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत समीर वानखेडे म्हणाले की, “माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला आणि तो मी केला. भारत हा पुरोगामी देश आहे त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लीम होती आणि बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला. कारण मी आईचा शब्द पाळला, मी गुन्हा केला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी करून घेतली,” असे स्पष्ट समीर वानखेडे यांनी सांगितले.
Photo of a Sweet Couple
Sameer Dawood Wankhede and Dr. Shabana Qureshi pic.twitter.com/kcWAHgagQy— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
तत्पूर्वी मलिकांनी दोन ट्वीट करत अगोदरच एक इशारा दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या निकाहचा फोटो ट्वीट करत लवकरच निकाहनामा सादर करणार असल्याचे म्हटले आहे. यात ७ डिसेंबर २००६ रोजी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये यांनी निकाह केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर त्यांनी केलेले आरोप जर खोटे ठरले तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारच जबाबदार’, संभाजी पाटील निलंगेकरांची टीका
- सुझानने अर्सलनच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाली ‘माझे सर्वकाही’ …


