Share

भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा मधील प्रमोद सावंत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच कोरोना काळात  गोवा भाजप सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाना साधत टीका केली आहे.

गोवा सरकारने राबविलेली ‘घर-घर रेशन’ ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ती राबवली गेली, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात गोव्यातील भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले, असा ठपका मलिक यांनी ठेवला आहे. भाजपची मंडळी मलिक यांचे हे आरोप फेटाळणार, हे तर उघड आहे. परंतु गोव्याबाबत त्यांनी जी विधाने केली आहेत, त्याबाबत शंका उपस्थित होण्याचे काहीच कारण नाही. कारण विद्यमान भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था सर्वच क्षेत्रांत केविलवाणी झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तेथील सरकारविरोधात जनमानसात तीव्र संताप आहे. कोरोनाची परिस्थिती या सरकारने नीट हाताळली नाही हे तर आहेच, पण तेथील आरोग्य यंत्रणा साफ कोसळून पडली आहे. कोरोनामुळे गोव्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनावरच कुऱ्हाड पडली. त्यामुळे राज्याचे अर्थकारण जसे बिघडले तसे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या चुली थंडावल्या. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अमली पदार्थांचा गोव्याभोवती पडलेला विळखा कमी होण्याऐवजी घट्टच होत चालला आहे. गोव्यातील भाजप सरकार कॅसिनो मालकांचे गुलाम बनले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!