🕒 1 min read
मुंबई: क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. त्यातच आता नवाब मलिक यांनी पुन्हा एक ट्वीट करत इशारा दिला आहे.
समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी असे ट्वीट करत नवाब मलिक यांनी त्यांच्या लग्नाचा निकाहनाम लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान ७ डिसेंबर २००६ रोजी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी निकाह केल्याचेही मलिकांनी म्हटले आहे. तसेच मेहेर म्याहणून ३३ हजार घेण्यात आले असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी निकाहनामाचाही एक फोटो ट्वीट करत तो लवकरच सदर करणार असल्याचे म्हटले आहे.
This is the 'Nikah Nama' of the first marriage of
'Sameer Dawood Wankhede' with Dr. Shabana Quraishi pic.twitter.com/n72SxHyGxe— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
दरम्यान नवाब मलिक रोज काही न काही खुलासे करत आहेत. त्यामुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. यामुळे विरोधी पक्षाकडून मलिक यांच्यावर टीकाही केली जात आहे. आता आज ते पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते काय नवीन खुलासा करणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सबळ पुरावे; राज्य सरकारची कोर्टासमोर माहिती
- ‘मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का..’म्हणणाऱ्या नेटकऱ्यांकडून जॅकलिन झाली ट्रोल
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडूनही सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी केली जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
