🕒 1 min read
औरंगाबाद : मागील एक- दोन वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक- प्राध्यापकांच्या वेतन वाढीसंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट धर्मनिरपेक्ष संघटनेच्या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. मानधन वाढीचा शासन आदेश शासनाने जाहीर केला असून १ ऑक्टोबरपासून या वेतनवाढीची अंमलबजावणी होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेने स्वागत केले आहे. शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे या संघटनेच्या प्रमुख सल्लागार असून गेली दोन वर्षे त्या सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करीत असून त्यांच्या मागणीला यश आले आहे.
शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेने स्वागत केले असून शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली हि प्राध्यापकांची मागणी ठाकरे सरकारने मान्य केली असून आमच्या संघटनेच्या सल्लागार डॉ. मनीषा कायंदे यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या मदतीने आम्ही शासनाकडे गेली दोन वर्षे या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ .प्रा. विजय पवार यांनी दिली.
यापूर्वी पदविस्तरावर काम करणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील शिक्षकांना केवळ ३०० रुपये प्रतितास एवढे तुजपुंजे मानधन मिळत होते. पुढे ते प्रतितास ५०० रुपये करण्यात आले मात्र नव्या आदेशानुसार ६२५ रुपये प्रतितास इतके मानधन मिळणार आहे . जवळपास २५ % इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे. तसेच शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील शिक्षकांना ७५० रुपये प्रतितास मानधन मिळणार असून प्रात्यक्षिकाच्या मानधनात देखील कला, वाणिज्य विज्ञान शाखेसाठी रुपये २५० तर विधी आणि शारीरिक शिक्षण शाखेसाठी रुपये ३०० प्रतितास इतकी वेतनवाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी
- समीर वानखेडे कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत- क्रांती रेडकर
- समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरील नवाब मालिकांनी केलेले आरोप खोटे? कागदपत्रे आली समोर
- बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा
- रेस्टॉरंटमध्ये विसरली मुलाला; आयुषमानच्या पत्नीने सांगितला ‘तो’ किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
