Share

‘महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी’, चित्रा वाघ यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. या हत्या, अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

जवळे येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची वाघ यांनी भेट घेऊन धीर दिला. भाजपच्या वतीने एक लाखांच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटूंबियांकडे सूपूर्द केला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. वाघ म्हणाल्या, राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतून अत्याचार झालेल्या महिलांना, मुलींना आर्थिक मदत करण्यात येते. त्याच धर्तीवर अत्याचार व हत्या झालेल्या महिला व मुलींच्या कुटूंबियांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे.

मनैधैर्य योजनेच्या धर्तीवर हत्या झालेल्या मुलीच्या कुटूंबियांना आधार देण्याची योजना आखणे आवश्यक आहे. जवळे येथील पीडितेच्या कटुंंबाला राज्य सरकारने २५ लाखांची मदत द्यावी. पीडितेच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या कोणालाच या प्रकाराबाबत माहिती नाही का? शेजाऱ्यांवर दबाव आहे का? कोणी दहशत निर्माण केली आहे का? अशा शंका वाघ यांनी व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!