Share

‘विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मेट्रोने जोडणार’, नितीन गडकरींची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोनं जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. पुढील दीड वर्षांत मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरं जोडण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. ते १९४५ कोटी निधीतून अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ कि.मी. महामार्ग प्रकल्पाच्या लोकार्पण व भूमीपूजन प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते.

अमरावती-नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, खासगी तत्त्वावर मेट्रो चालवली जाईल. यासाठी अमरावती येथील उद्योजकांनी पुढे यावे, प्रत्येक जिल्ह्यातून १० उद्योजकांची यासाठी निवड केली जाईल. मेट्रोमुळे अमरावती-नागपूर हा प्रवास केवळ १ तास २५ मिनिटांत पूर्ण होणार असल्यामुळे वेगाने वाहतूक शक्य आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रास्थळासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीनुसार ३५ कोटी दिले असून, याद्वारे येथील सुशोभिकरण, यात्रेकरूंसाठी सुविधा आणि विकासकामे पूर्ण केली जातील असेही गडकरी यांनी सांगितले.

मंत्री गडकरी म्हणाले की, पुढील दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासा इतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!