🕒 1 min read
मुंबई : ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या ओबीसी जागर अभियानामध्ये केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांंनी महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यामुळे सहाजीकच त्यांना मी मुख्यमंत्री असल्याची भावना वाटणे गैर नसल्याचे सांगत, सध्याच्या मुख्यमंत्र्याकडे कोणतेच काम नाही, त्यांचे काम हे शरद पवार असल्याची टीका केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण अद्यापही दिलेले नाही, मराठा समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. परंतु आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टिकाही यावेळी कपील पाटलांनी केली आहे.
ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळावे यासाठी केंद्राने राज्याला अधिकार दिले असतांनाही आरक्षण देण्याऐवजी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ सरकार कसे टिकेल यासाठी प्रयत्न केला जात आहे. या महाविकास आघाडी सरकाराने सत्तेत आल्यापासून नुसता गोंधळ घातला आहे, असं कपील पाटलांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
- शिल्पा-राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात कोर्टात ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा
- अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची रयतने केली होळी

