Share

बीडच्या नुकसानग्रस्तांची स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी घेणार भेट

Published On: 

बीड : अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर रविवारी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बनसारोळा (ता.केज) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पवार यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर हे १० व ११ ऑक्टोबर दरम्यान केज, धारूर, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवाद साधणार आहेत. तर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी ६ वाजता बनसारोळा येथे शेतकरी मेळावा आणि सोमवारी सकाळी १०.३० वाजता तलवाडा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची परिषद होणार आहे.

मेळावा व परिषदेत एफआरपीचे तीन तुकडे न करता केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या एफआरपीनुसार उसाचे बिल एक रक्कमी देण्यात यावे, बीड जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, सन २०२० च्या खरीप हंगामाचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा, पुराने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, त्यांना ऑगस्ट २०१९ च्या शासन अध्यादेशानुसार भरीव मदत देण्यात यावी, सन २०२१ च्या पिक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तात्काळ देऊन १०० टक्के पीकविमा मंजूर करावा, पुराने घरे, पशुधन वाहून गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. या मागण्या मांडण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!