Share

‘फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

Published On: 

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र तथा भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘चिपी विमानतळासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे शिवसेना धावत होती. मात्र, जेव्हा उद्घाटनाची वेळ आली तेव्हा साधे त्यांना आमंत्रितही केले नाही. हीच ती उद्धव सेना आहे. वेळेचे महात्म्य यालाच म्हणतात. हिसाब तो जरूर होगा असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1446707942678581251

तर दुसरीकडे शुक्रवारी विधान परिषेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या दोघांचीही नावे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे तर विमानतळाच्या बांधकामात योगदान असताना त्यांचेही नाव नाही. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असते. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, असं दरेकर यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!