मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल. या उद्घाटनापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. काल शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.
‘यांनी काय केलं? आम्हीच सर्व केलं. परवानगी सुद्धा मी आणली. यांना कोण विचरतंय दिल्लीत? कायद्याने कामे करावी लागतात. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी. कोकणात अडवणूक नाही तर हप्तेबाजी सुरू आहे. उद्या जाहीर सभेत कोण आहे त्यांची नावे सांगणार… ‘हे’ ‘हेच’ आहेत विरोध करणारे असं सांगणार. वास्तववादी चित्र कोकणी माणसासमोर ठेवणार, तुमच्या विकासाच्या आड येणारी ही लोकं आहेत. उद्या यांचा भांडाफोड करणार असंही नारायण राणेंनी म्हटले होते.
मात्र, आता त्यांच्या बोलण्याच्या काही तासांतच आज राणे यांनी तलवार म्यान केली आहे. चिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी कोणतेही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. नारायण राणे आज सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही. राजकारण केलं जाणार नाही. उद्घाटनाला कोणतंही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

