मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज दुपारी १२.३० वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.
दरम्यान, चिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी कोणतेही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. नारायण राणे आज शनिवारी सकाळी सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही. राजकारण केलं जाणार नाही. उद्घाटनाला कोणतंही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू’, असे सांगितले.
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, यावर प्रश्न विचारला. त्यावर राणे म्हणाले की, ‘ही चांगली गोष्ट आहे. अनेक वर्षांनी हा योग आला’. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी पुन्हा हा योग येईल का? असा प्रश्न केला. त्यावर ‘ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा’, असे म्हणत राणे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास टाळले.
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

