उस्मानाबाद : भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी गुरुवारी (दि. ७) तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे विनारवाना दर्शन घेतले. प्रशासनाला गुंगारा देत त्यांनी हे दर्शन घेतले आहे. मंदिरे खुली झाली असली तरी, घटस्थापना आणि इतर विधींमुळे गुरुवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना दर्शन देण्यात येणार होते.
मात्र, तरीही देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक ताटकळत उभे असताना, भोसले यांनी नियमांची पायमल्ली करत दर्शन घेतले. मंदिरात नियम डावलून प्रवेश करत पूजा केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
आचार्य तुषार भोसले यांनी गुरुवारी (दि.७) नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ११:५८ ते १२:३० च्या सुमारास मंदिर कार्यालयात कोणतीही पूर्वकल्पना न देता राजे शहाजी महाद्वारमधून प्रवेश करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश बंदच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्याचबरोबर कोरोनाचा प्रसार आणि प्रचार होईल असे कृत्य केले. त्यामुळे मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) प्रवीण अमृतराव यांच्या फिर्यादीवरून तुषार भोसले (रा. शालिग्राम, नाशिक) यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात भादंवि १०९, १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दर्शन घेतल्यानंतर या संदर्भात तुषार भोसले यांना विचारले असता, पासचे आम्हाला माहीत नाही. मंदीर प्रशासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना विचारा, असे उत्तर त्यांनी दिले आहे. तुषार भोसलेंसोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे देखील विना परवाना मंदिरात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
- ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
- महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?


