🕒 1 min read
नाशिक – दिंडोरी भागातील रस्ते… पाणी वीज… या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी आणि झिरवाळसाहेब व्यक्तीशः प्रयत्न करू… तुम्ही कार्यकर्त्यांनी… पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेल्या पदाला न्याय द्यावा आणि पक्ष संघटनेला बळकट करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिंडोरी येथे केले.
आधी आमदार म्हणून झिरवाळसाहेब मंत्र्यांकडे जायचे आणि मतदारसंघाचे काम करून घ्यायचे. आज झिरवाळसाहेब केबिनमध्ये असतात आणि मंत्री भेटीसाठी आपला नंबर कधी लागेल याची वाट पाहतात. पवार साहेबांचं दिंडोरीवर प्रेम आहे म्हणून हा मान या मतदारसंघाला दिला आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.
मागच्या निवडणुकीत आपल्याला किती मतदान पडले… किती विरोधात पडले…याचा अभ्यास करा. जी मते विरोधात पडली त्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्या अडीअडचणींना धावून जा. गेली २१ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस लोकांच्या प्रश्नांसाठी काम करत आहे मात्र आपण ते आपण सांगत नाही. दुसरीकडे भाजप काम करो न करो त्याची रितसर जाहिरात केली जाते. हे चित्र आता बदलायला हवं. केंद्रसरकारचे चुकीचे धोरण लोकांना जावून सांगा, भाजपचा खोटारडेपणा लोकांसमोर आणा असेही आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
जवळपास १५० मतदारसंघ पूर्ण करून प्रदेशाध्यक्ष आढावा घेण्यासाठी आज दिंडोरी मतदारसंघात आले आहे. या मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यावेळी मोठ्या लीडने या भागातील लोकांनी निवडून दिले आहे. यंदा संघटनेवर इतका भर दिला जाईल की पुढच्या वेळी ही लीड दुप्पट होईल असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

