🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदार संघातून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी प्रतिस्पर्धी प्रियांका टिबरेवाल यांना पराभूत करत ५८ हजार ३८९ मतांनी विजय मिळविला आहे. तर आता पराभूत उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांनी मोठा दावा केला आहे.
ममता बॅनर्जी जरी जिंकल्या असल्या तरी मी या गेमची ‘मॅन ऑफ द मॅच’ आहे. कारण मी ममता बॅनर्जींच्या गडात निवडणूक लढवली. आणि 25,000 पेक्षा जास्त मते मिळवली. मात्र मी हार मानणार नाही.मी कठोर परिश्रम करत राहणार. असे मत प्रियांका
तिब्रेवाल यांनी व्यक्त केले आहे.
I am 'Man of the Match' of this game because I contested the election in Mamata Banerjee's stronghold and got more than 25,000 votes. I will continue doing the hard work: Bhabanipur BJP candidate Priyanka Tibrewal pic.twitter.com/pAiQMutcHi
— ANI (@ANI) October 3, 2021
दरम्यान ममता बॅनर्जी या निवडून आल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत टीएमसी पक्षाने मोठे परिश्रम घेतले आहेत. भवानीपूर मतदारसंघ निवडणुकीतील मतदानाच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ममता बॅनर्जी या ५८ हजार ८३२ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना फक्त पेन आणि पेपर याव्यतिरिक्त कोणतीही वस्तू मतमोजणीच्या केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली होती. ममता बॅनर्जी ५० हजार मतांनी जिंकणार असा दावा टीएमसी पक्षाने केला होता. अखेर हा दावा खरा ठरला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी या तीनही मतदार संघातील मतदान झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

