🕒 1 min read
पुणे: केंद्र सरकारने केलेले नवीन बॅंकिंग नियमन कायदे, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नियम हे देशातील नागरी सहकारी बॅंका आणि जिल्हा बॅंकासाठी मारक आहेत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी त्यांनी देशातील सहकार चळवळ संपविण्याचा डाव दिसत असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हे नवे धोरण हाणून पाडण्यासाठी सहकारी बॅंकांना न्यायालयाची दारे ठोठवावी लागतील. तशी तयारी ठेवण्याचा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी काही आठवणीही सांगितल्या. ते म्हणाले की, मी केंद्रीय कृषिमंत्री असताना नागरी सहकारी आणि जिल्हा सहकारी बँकांना वरदान ठरणारी ९७ वी घटनादुरुस्ती केली. ही घटनादुरुस्ती करण्यापूर्वी सर्व राज्य व जिल्हा सहकारी बँकेची मते जाणून घेतली होती. आता मात्र केंद्र सरकारचा बॅंकिंग नियमन कायदा सहकारी बॅंकांसासाठी मारक ठरत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी


