Share

‘शिवसेनेने चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार सुरू केलाय’, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत भाजप आणि मनसेने सातत्याने आवाज उठवला. मात्र त्यानंतर आता उशिराने पालिका प्रशासनाला जाग आली आणि मुंबईतील खड्डे भरण्यास मुहूर्त मिळाला आहे. खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी अभियंत्यांनी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश पालिका आयुक्तांनी यांनी दिले आहेत.

या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे प्रयत्न कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो!’ असे ट्विट पाटील यांनी केले आहे.

तसेच ‘डांबरीकरणानंतर केवळ १२ तासांत पुन्हा खड्डे पडले, तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे.’

‘दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!