🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदार संघातून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी प्रतिस्पर्धी प्रियांका टिबरेवाल यांना पराभूत करत ५८ हजार ३८९ मतांनी विजय मिळविला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने तसे ट्विट केले आहे.
याआधीच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना सत्ता मिळाली होती मात्र त्यांची स्व:तची जागा जिंकता आली नाही. त्यामुळे त्या आता परत पोटनिवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. ही जागा जिंकल्यास त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते.
ममता बॅनर्जी या निवडून आल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत टीएमसी पक्षाने मोठे परिश्रम घेतले आहेत. भवानीपूर मतदारसंघ निवडणुकीतील मतदानाच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ममता बॅनर्जी या ५८ हजार ८३२ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांना फक्त पेन आणि पेपर याव्यतिरिक्त कोणतीही वस्तू मतमोजणीच्या केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली होती.
I have won the Bhabanipur Assembly bypolls with a margin of 58,832 votes and have registered the victory in every ward of the constituency: Chief Minister Mamata Banerjee in Kolkata pic.twitter.com/EjK8htjUmC
— ANI (@ANI) October 3, 2021
ममता बॅनर्जी यांच्या प्रतिस्पर्धी प्रियांका टिबरेवाल यांचा पराभव निश्चित झाल्याचे चित्र पहिल्या फेरीपासूनच दिसून येत होते. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जीच निवडून येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या जागेसाठी ५३ टक्के मतदान झाले आहे. यात बहुतांष बोगस मतदान झाल्याचा अरोप भाजपाने केला आहे.
ममता बॅनर्जी ५० हजार मतांनी जिंकणार असा दावा टीएमसी पक्षाने केला होता. अखेर हा दावा खरा ठरला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी या तीनही मतदार संघातील मतदान झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

