🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाी बोलण्याच्या ओघात चक्क मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाच नाव घेतलं. विनायक राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा विसर पडला असल्याचं स्पष्ट दिसून आलं. राऊतांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राऊतांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला आणि राजकीय वर्तुळात टीका-टिपण्ण्या सुरु झाल्या. या प्रकारानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी आता ट्विटरच्या माध्यमातून विनायक राऊत यांची चांगलीचखिल्ली उडवली आहे.
‘शिवसेना खासदार विनायक राऊत यांना अद्याप माहिती नाही की राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची. नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच घातली आहे’, असं म्हणत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊतला अद्याप माहिती नाही राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची, नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच घातली आहे. pic.twitter.com/IfvQYmP3Uk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 2, 2021
दरम्यान, विनायक राऊत हे शनिवारी (२ सप्टेंबर) सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, प्रसारमाधम्यांशी बोलताना राऊत यांनी चक्क अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला आहे. यानंतर आता विनायक राऊतांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या राणे यांना टीकेची मोठी संधी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

