Share

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून रोज प्लॅन तयार केले जात आहेत’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट करून रोजच सरकार पाडण्यासाठी भाजपकडून नवीन नवीन प्लॅन तयार केले जात आहेत. त्यासाठी ईडी यासारख्या तपास संस्थांचा वापर होत आहे. सरकारवर असे किती हल्ले केले तरी फरक पडणार नाही, असा हल्लाबोल करत जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकापाठोपाठ एक सरकारी कंपन्या विकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकायला काढला आहे, असा टोला लगावला.

चार दिवसीय नाशिक दौऱ्यावर असलेल्या पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी मेळावा घेतला. ते म्हणाले,लोकांच्या मनात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधातील विचारांचे विष पेरण्याचे काम सुरू आहे. पण बूथ कमिट्यांच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून अपप्रचार थांबवणे तुमच्याच हातात आहे. ईडीच्या चौकशा लावून मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपच्या नेत्यांकडून अमलात आणले जात आहे

आताच एका ऑडिओ क्लिपमधून पुढील पंधरा दिवसांत एका मंत्र्याला टार्गेट केले जाणार असल्याचे पुढे आले आहे. तसेच परमबीरसिंग पुन्हा मुंबईचे पोलिस आयुक्त होतील किंवा त्यांना दिल्लीमध्ये उच्च पदावर नेमणूक दिली जाईल, असे दावे केले जात आहेत. केंद्राचे हे कुटिल कारस्थान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम झाल्या पाहिजेत, असाही सल्ला त्यांनी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी मेळाव्यादरम्यान दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!