Share

शिवसेनेच्या खेळीमुळे काँग्रेसचा रिव्हर्स गिअर; पालिकेसाठी आघाडी करण्याचे थोरातांचे संकेत

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महापालिकेच्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेस मंजुरी देवून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच गोच्ची केल्याचे स्पष्ट होत आहे. या खेळीमुळे सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देणार्‍या काँग्रेसने रिव्हर्स गिअर टाकला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महापालिका निवडणुका महाविकासआघाडीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पक्ष वाढीसाठी काँग्रेस पक्ष राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची गर्जना प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सर्व प्रथम केली होती. पटोले यांच्या या गर्जनेमुळे महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही पटोले यांच्या सूरात सूर मिसळत स्वबळाचा नारा देण्यास सुरूवात केली होती.

दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडूनही स्वबळाच्या घोषणा झाल्या. राज्यात सरकार असल्याने महापालिका निवडणुकीसाठी आपलेच नगरसेवक जास्त निवडूण यावेत, यासाठी भाजपने आणलेली चार सदस्यीय प्रभागरचना मोडीत काढून एक सदस्यीय वॉर्ड किंवा दोन सदस्यीय प्रभाग करण्याचे संकेत दिले जात होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!