🕒 1 min read
लातूर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात एकही पात्र आपदग्रस्त शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पावसामुळे झालेले हे नुकसान अभूतपूर्व असून येत्या चार ते पाच दिवसात पंचनामे पूर्ण करुन शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही, विमा कंपन्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. ज्यांच्या घरात पाणी घुसले आहेत, त्या कुटुंबियांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
#अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मुळे #लातूर जिल्ह्यात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.आपदग्रस्तांच्या ज्या भावना आहेत त्याच्याशी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकरूप आहे,एकही पात्र आपदग्रस्त शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही,याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही पत्रकार परिषदेत दिली. pic.twitter.com/2mCZFDjn5z
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) October 1, 2021
अतिव़ृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. तसेच शहरातील रस्ते दुरुस्ती करण्याची मोहिम नगर परिषद आणि महानगर पालिकेने हाती घेण्याच्या सूचना केल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच जलव्यवस्थापणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या असल्याचेही देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

