Share

आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले; पंकजा मुंडेंचा सरकारवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

परळी : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. परळी येथे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेसह जयंत पाटलांनी पूरस्थितीची शेतातील नुकसानीची पाहणी केली आहे.

सततच्या पावसामुळे मराठवाड्यातील नागरिकांचे जनजीवन तर विस्कळीत झाले आहेच तर शेतीचे देखील भयंकर असे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. भाजच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

आज त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘आमचे सरकार असताना पीक विमा लाखोंनी आला होता. या दोन वर्षात फक्त मोदींचे दोन हजार रुपये आले. मात्र, राज्य सरकारनं काहीही दिलं नाही. आम्ही जे सेवा दिली त्यात आम्ही जात आणि राजकारण पाहिलं नाही.

आम्ही विकास पाहिला. तुम्हाला संधी दिली आहे, तर जनतेची सेवा करा. आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पाकलकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळांच्या परिणामामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. तर यामुळेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!