🕒 1 min read
थिरुवअनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. तेथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
राहुल गांधी भाजपला उद्देशून म्हणाले, ‘ते म्हणतात भारत एक राज्य आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे इथले नागरिक आणि त्यांचे परस्पर संबंध आहेत. हे परस्पर संबंध हिंदू-मुस्लिमांमधील आहेत. तसेच हिंदु-मुस्लिम-शीख आणि तामिळ, हिंदी, उर्दू, बंगाली यांच्यातील आहेत. पंतप्रधानांसोबत माझी अडचण हीच आहे की, ते हे परस्पर संबंध तोडत आहेत.’
They say India is a territory, we say India is people, relationships. It's the relationship between Hindu & Muslim, between Hindu, Muslim & Sikh, between Tamil, Hindi, Urdu, Bengali. My problem with PM is that he's breaking these relationships: Rahul Gandhi in Malappuram (Kerala) pic.twitter.com/1Sk3HqogUO
— ANI (@ANI) September 29, 2021
‘जर भारतीयांमधली नाती पंतप्रधान मोदी तोडत असतील, तर ते ‘भारत’ या संकल्पनेवरच आघात करत आहेत. म्हणून मी त्यांना विरोध करत आहे. आणि त्याचप्रकारे जर ते नाती तोडत असतील, तर भारतीयांमधला दुवा पुन्हा एकदा उभा करणे हे माझे कर्तव्य आणि बांधिलकी आहे’, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महिलांवर हात टाकल्यांनतर फरार आरोपींना पकडणार आहात का?’, चित्रा वाघ यांचा पोलिसांना सवाल
- ‘रस्ते कंत्राटदारांवर कारवाईची हिंमत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात आहे का?’ नितेश राणेंचा सवाल
- राज्यभरात रस्त्यावर खड्ड्यांची समस्या, मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
- ‘कन्हैया कुमारचा काँग्रेस प्रवेश म्हणजे गटारातून नाल्यात पडणे’, भाजपची टीका
- ईडीची पिडा! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर ईडी आनंदराव अडसूळांची चौकशी करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
