Share

‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’

Published On: 

नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. काल पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान, सिद्धू यांच्यावर शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी हल्लाबोल केला आहे. ‘मी आधीच सांगितले होते की नवज्योत सिंग सिद्धू हे एक दिशाहीन मिसाईल आहे, ज्याला माहीत नाही की ते कुठे जाईल किंवा कोणास मारेल. त्यांनी सर्वात आधी पंजाबकाँग्रेस अध्यक्ष बनून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि आता त्यांच्या पक्षाचा नाश केला,’ अशी घणाघाती टीका बादल यांनी केली आहे.

पंजाबमधील राजकीय वातावरण तापले असतानाच सिद्धू यांनी टि्वटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी सत्यासाठी लढत राहणार असल्याचं म्हटलं आहे. ‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सत्यासाठी मी लढाई सुरु ठेवीन. मी पंजाबच्या कल्याणासाठी लढतोय. त्याच्याशी मी अजिबात तडजोड करणार नाही. मी व्यक्तीगत अजेंड्यासाठी लढत नाहीये’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!