वाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाल्यावर आता भावना गवळींना ईडीकडून समन्स आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नुकतीच ईडीने परभणी जिल्ह्यातील पाथरी याठिकाणी छापेमारी केली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सईद खान यांना अटक केली असून ते भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही – चरणजीतसिंग चन्नी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
