मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळयांना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या महमूदचे आयुष्य म्हणजे सिनेसृष्टीतील गोल्डन मेमरी आहे. महमूद अली यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ साली मुंबई येथे झाला. अमेरिका फिल्म जगतचे प्रसिध्द हास्य अभिनेता म्हणून सर्व परिचित होते. तीन दशके गाजवून त्यांनी ३०० हून अधिक हिंदी चित्रपटात काम केले आहे.
त्यांच्या बहुआयामी भूमिका दर्शकांना हसवले, तेवढयाच गंभीरपणे रडवले ही. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले. तसेच त्यांनी चित्रपटात गीत गायले, शिवाय चित्रपट निर्मिती आणि निर्देशनाची बाजू देखील तितक्याच ताकदीने सांभाळली. मुंबईतील प्रसिध्द नतृकी मुमताज अली चे सुपुत्र तर अभिनेत्री मिन्नो मुमताज अलीचे बंधू होते. महमूद यांनी अभिनेत्री मीना कुमारीची बहिण मधूशी लग्न केले. त्यांचा ‘दुश्मन दुनिया का’ १९९६ हा चित्रपट शेवटचा ठरला. या चित्रपटाद्वारे त्यांचा मुलगा मंजूर अली ला लाँच केले. तसे महमूद १९५८ सालचा चित्रपट ‘परवरीश’ मध्ये पहिला ब्रेक मिळाला. ज्यात राज कपूर च्या भावाची भूमिका केली. १९६१ साली ‘ससूराल’ त्यांच्या करिअरमधील महत्वपूर्ण चित्रपट ठरल्या. या चित्रपटाद्वारे त्यांचा ‘हास्य’कलाकार अशी वेगळी ओळख निर्माण झाली होती.
यानंतर ‘जौहर महमूद इन गोवा’ मध्ये त्यांनी कॉमेडियन म्हणून तर भूमिका केली, त्याचबरोबर मुख्य भूमिकेत ही अनेक चित्रपटांत अभिनय केला. त्यात ‘प्यार किए जा’ आणि पडोसन हे चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय झाले. विशेष म्हणजे पडोसन में दक्षिण भारतीय गायक असलेली वेशभूषा आज ही लोकप्रिय आहे. त्यानंतर छोटे नवाब, भूत बंगला, बाँम्बे टू गोवा आदी अनेक चित्रपटा कॉमेडी आणि गंभीर भूमिका केल्या. महमूद यांनी ‘बाँम्बे टू गोवा’ चित्रपट निर्मिती करून सुपरस्टार अमिताब बच्चन यांच्या पडत्या काळात साथ दिली. मात्र कालांतराने आरोग्याच्या तक्रारीमुळे महमूद अमेरिकेत इलाजासाठी गेले, अन २३ जुलै २००४ ला त्यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील हसता खेळता विनोदी नट गेला. मात्र चित्रपटाच्या माध्यमाने आज आपल्यात असल्याची जाणीव होत असते, शिवाय प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतात.
महत्त्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- ‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
