🕒 1 min read
अबुधाबी : दुबई मध्ये सुरु असलेल्या आयपीएलची रंगत आता वाढताना दिसत आहे. सगळेच संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरताना दिसत आहेत. आयपीएलच्या 41 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सची विजयाची साखळी मोडत 3 गडी राखून पराभव केला. या विजयासह कोलकाताने 10 गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच प्ले ऑफच्या आशाही कायम राखल्या आहेत.
दरम्यान, या सामन्यातला रिषभ पंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या सामन्यादरम्यान एक मोठा अपघात होता-होता टळला आहे. केकेआरचा विकेट किपर-बॅट्समन दिनेश कार्तिक या मॅचमध्ये दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात वाचला.
https://twitter.com/Phoenix09004/status/1442827025123667974?s=20
हा सर्व दिल्लीच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला आहे. झाले असे की, वरुणच्या पहिल्या बॉलवर पंतला ड्राइव्ह मारायचा होता. पण, बॉल त्याच्या बॅटच्या खालच्या भागाला लागून स्टंपच्या दिशेनं जात होता. तो बॉल पकडण्यासाठी कार्तिक पुढे आला. त्याचवेळी पंतनं बॉल अडवण्यासाठी मागे न पाहताच जोरात बॅट फिरवली. पंतनं बॅट इतक्या जोरात फिरवली होती की कार्तिकला सावरण्याची संधी मिळाली नाही. सुदैवानं यावेळी कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी पंतची बॅट कार्तिकच्या हेल्मेटजवळून गेली. या घटनेनंतर पंतनं लगेच कार्तिकची माफी मागितली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, प्रचंड नुकसान; वडेट्टीवारांनी केंद्राकडे केली महत्वाची मागणी
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- ८ तासांच्या चौकशीनंतर मंत्री अनिल परब ईडी कार्यालयाच्या बाहेर!
- सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
