Share

शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता; उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत; शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध 35 शेतीपिकांच्या वाणांचं लोकार्पण झालं; त्यावेळी ते बोलत होते. हवामान बदल आणि कुपोषण या समस्यांचा सामना करण्याच्या दृष्टीनं ही वाणं भारतीय कृषी संशोधन परिषदेनं विकसित केली आहेत. यात चणे, सोयाबिन, तांदूळ, गहू, मका, बाजरी, पशुखाद्य म्हणून वापरली जाणारी धान्यं, डाळी यांचा समावेश आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवादही साधला.

या प्रसंगी पंतप्रधानांनी कृषी विद्यापीठांना हरित परिसर पुरस्कारांचं वितरण केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट रायपूरचे नवनिर्मित कॅम्पसचे लोकार्पणही त्यांनी केलं.जेव्हा शेतकरी आणि शेतीला सुरक्षा मिळते तेव्हा वाढ वेगाने होते.जमिनीच्या संरक्षणासाठी 11 कोटी मृदा आरोग्य कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी किमान आधारभूत किंमत वाढवण्याबरोबरच खरेदी प्रक्रिया देखील सुधारली गेली, असं ते म्हणाले. रब्बी हंगामात 430 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गहू खरेदी करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांना 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यात आले. कोरोना साथीच्या काळात गहू खरेदी केंद्रांमध्ये तीन पटीने वाढ करण्यात आली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे, त्यांना बँकांकडून मदत मिळवणे सोपं झालं आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आता शेतकऱ्यांना हवामानाची माहिती चांगल्या प्रकारे मिळत आहे. 2 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!