यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड पुसद मार्गावरील दहेगाव पुलावरील पाण्यात काल एसटी बस वाहून गेल्याची घटना घडली होती. सकाळी सुमारे आठच्या सुमारास पुलावर पुराचे पाणी आले असताना देखील त्यातून एशियाड बस घालण्याचे नसते साहस चालकाने केले आणि ते एकूण चार जणांच्या जीवावर बेतले.
तर या बसमधील दोन प्रवासी एका झाडावर तर दोन प्रवासी बसच्या टपावर चढून बसले असून, त्यांची सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि तालुका आपत्ती निवारण दलाने प्रयत्न केले. दरम्यान, गाळात फसलेली बस आज नाल्यातून काढण्यात यश आले आहे. एसटी बस मधील बेपत्ता असलेला एक मृतदेह नाल्यापासून दीड किलोमीटर अंतरावर बचाव पथकाला आढळला. सदरचा मृतदेह हा बस चालकाचा असल्याची महिती आहे. या दुर्घटनेत काल तीन व्यक्ती मृत झाल्या होत्या.
काल रात्री मुसळधार पावसामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवावे लागले होते. यानंतर पुन्हा एकदा सकाळी हे ऑपरेशन सुरु केले असता मृतदेश व बस बाहेर काढण्यात आली. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या (MH 14 BT 5018) या एसटीच्या हिरकणी बसचा अपघात झाला होता. या अपघातात 2 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
दरम्यान, ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्याची सरकार जबाबदारी घेईल. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून पाण्यात बस घालू नये, अशा वाहन चालकांना सक्त सूचना देण्यात येतील आणि यामध्ये चूक कोणाची आहे याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. तर, मराठवाड्यासह विदर्भ आणि नाशिकमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. नद्या, नाले यांना गंभीर पूर आला असून अनेक गावं-वस्त्या पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- नाशिकमध्ये जनजीवन विस्कळीत; शहराला महापुराचा धोका,अलर्ट जारी
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- केबीसीमध्ये पुन्हा स्पर्धकाला विचारला चुकीचा प्रश्न?; सोशल मीडियावर होतेय चर्चा
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना


