Share

पंतप्रधान मोदी मायदेशी परतले; भाजप नेत्यांकडून जल्लोषात स्वागत

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्याहून भारतात परतले. भारतात परतल्यानंतर विमानतळावर भाजप नेत्यांकडून जल्लोषात मोदींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, भाजप अध्यक्ष यावेळी जे. पी. नड्डा आणि पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

मोदी ३ दिवस अमेरिकेमध्ये होते. यादरम्यान त्यांनी २० बैठकांमध्ये उपस्थिती लावली. तसेच अमेरिकेला जाताना आणि परतताना पंतप्रधान मोदींनी विमानतही अधिकाऱ्यांसोबत ४ मोठ्या बैठका घेतल्या. अमेरिकेले जाताना दोन बैठका आणि तिथे पोहोचल्यानंतर तीन बैठका घेतल्या.

दरम्यान, पंतप्रधान दिल्ली मध्ये पोहोचताच त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देत पंतप्रधान मोदींनी संबोधनाला सुरवात केली. त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच यावेळी दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, दिल्लीचे ७ खासदार, भाजपशासित ३ महापालिकांचे महापौर, एनडीएमसीचे सदस्य आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!