🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेनचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक सदरातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आजच्या रोखठोकमधून संजय राऊत म्हणाले कि, ‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असे मला वाटते. चंद्रकांत पाटील यांची तर वेगळीच तऱ्हा आहे.
पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली, पण कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले! एकंदरीत सगळीच गंमत आहे,’ असे राऊत यांनी सामनाच्या रोकठोक या सदरामध्ये लिहिले आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्रं लिहिलं,त्यामुळे त्यांचंच धोतर सुटलंय, असं सांगतानाच महाराष्ट्रातील विरोधकांनी हास्यजत्रा करून ठेवली आहे. किती मनोरंजन कराल?,असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच चंद्रकांत पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेवून फिरतात. यावर राऊत म्हणाले पहाटेच्या शपथविधीनंतर एकमेव अजित पवार 72 तासांत भाजपच्या खिशातून सटकले. 100 अजित पवार भाजपला कसे झेपणार? यादरम्यान त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संज्या पवार कुटुंबाची किती चाटूगिरी करणार, जिभेला आराम दे. चंद्रकांतदादांनी अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य इतकं झोबलं की दोन दिवस संज्या त्यावरच बोलतोय,’ असे टोला निलेश राणेंनी लगावला आहे.
तसेच ‘संज्या ते पवार कुटुंब आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील,’ असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांसह पवार कुटुंबावर देखील निशाणा साधला आहे. तसेच संज्याला उगाच माजी संपादक नाही करून टाकला. खातो सेनेचं आणि काम करतो राष्ट्रवादीचं,अशी घणाघाती टीका देखील निलेश राणेंनी केली आहे.
संज्या पवार कुटुंबाची किती चाटूगिरी करणार, जिभेला आराम दे. चंद्रकांतदादांनी अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य इतकं झोमलं की दोन दिवस संज्या त्यावरच बोलतोय. संज्या ते पवार कुटुंब आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 26, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- इमरान हाश्मी साकारणार आणखीन एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
