Share

चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विविध राज्यांचे दाखले देत देशातूल महिला अत्याचारांचा लेखाजोखाच मांडला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. यासोबतच, राज्यपालांची भूमिका ही सरकारविरोधी लोकांशी सुसंगत असून हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या पत्राचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या पत्राची प्रत जाळतं जाहीर निषेध केला.

यावेळी त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे अत्याचारपिडीत महिलांच्या वेदनेची थट्टा उडवणे आहे. मुख्यमंत्री महोदयजी….तुमच्या नाकाखाली राज्यातील महिला मुलींवर अत्याचार सुरू आहेत देशातील प्रत्येक होणार्या घटना वाईटचं…आम्हाला त्याची संवेदना आहेचं पण आम्ही महाराष्ट्रात होणार्या प्रत्येक घटनेवर तुम्हाला प्रश्न विचारणारचं व तुम्हाला त्याची उत्तर द्यावी लागतील. NCRB च्या रिपोर्ट नुसार महिला मुली अत्याचार बाबत TOP 5 मध्ये आपण आहोत याचं भान ठेवा. आपलं आजचं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुदैव आहे,’ असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

वाचा मुख्यमंत्री ठाकरे यांचे सविस्तर पत्र –

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!