जळगाव : जळगावमधील पाचोरा शहरात एक इमारत क्षणात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या इमारतीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून ही खळबळजनक घटना चर्चेचा विषय ठरली आहे. याचे कारण म्हणजे केवळ पाच वर्षांपूर्वीच ही इमारत बांधण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच इमारतीमधील लोकांना लवकरात-लवकर बाहेर काढण्यात आल्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात सदर इमारत होती. सोमवारी रात्री ही इमारत कोसळली. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीचे बांधकाम करताना त्यात तांत्रिक दोष राहिल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा शहरात गुंतवणूक म्हणून ही तीन मजली इमारत पाच वर्षांपूर्वी बांधली होती. परंतु इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. त्यामुळे धोका लक्षात घेत भाडेकऱ्यांनी अगोदरच इमारत रिकामी करुन घेतली होती.
दरम्यान, सोमवारी(२० सप्टें.)ही रात्रीच्या वेळेस पाऊस सुरु असतांना ही इमारतजागीच कोसळली. यानंतर पाचोरा भडगाव तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांची भेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांनी काँग्रेसला सोडले नाही, तर त्यांना बाहेर काढण्यात आले’, आठवलेंनी केला खुलासा
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
- मोठी बातमी! सोमय्यांविरोधात मंत्री अनिल परबांकडून १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

