पुणे : मागील काही दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पहायला मिळत आहे. आधीच विविध आरक्षणांमुळे अडकणाऱ्या शासकीय भरत्यांमध्ये कोरोनाची भर पडली. अनेक वर्ष परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणखी एका संधीची वाट पाहत तयारी करत आहेत, ज्या उमेदवारांची पूर्व परीक्षा झाली ते मुख्य परीक्षेची वाट पाहतायत तर ज्या उमेदवारांची मुख्य परीक्षा देखील झाली आहे ते नियुक्तीची वाट पाहतायत.
या सर्व चक्रामध्ये लाखो युवक-युवतींचे भविष्य हे अधांतरी टांगले गेले आहे. नियुक्ती होत नसल्याने स्वप्निल लोणकर याने टोकाचे पाऊल उचलले होते. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले होते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत MPSC मार्फत 15511 पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर 30 जुलै 2021 वित्त विभाग शासन निर्णयानुसार (GR)प्रमाणे प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर 2021 MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते.
विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी कोणत्या विभागाने MPSC आयोगाकडे मागणीपत्र पाठवले नाहीत त्यामुळे MPSC आयोगाने नवीन वर्षाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले नाही. तसेच नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या नाहीत. यामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा असंतोष पसरू लागला आहे. परंतु यावर आता शिवसेनेच्या युवासेना सहसचिव शर्मिला येवले यांनी मात्र सरकारवर MPSCच्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
‘अजित दादा हे शब्दाचे पक्के आहेत ते दिलेला शब्द नक्कीच पाळतात. याचा अनुभव आम्ही स्वतः घेतला आहे.त्यांनी केलेल्या घोषणेवर आम्हीही युवासेनेनेमार्फत या प्रश्नाची आग्रही भूमिका धरून आहोत. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण कशी होईल यावर लक्ष केंद्रीत करून आहोत आम्हाला विश्वास आहे कि सरकार लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करेल कारण महाविकास आघाडीने सत्तेत आल्यापासून वेळोवेळी विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले आहे आणि आता ही दादा विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळतील त्यामुळे निर्णय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत युवासेना याचा पाठपुरावा करीत लक्ष केंद्रित करेल.
‘ असे मत शर्मिला येवले यांनी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! सोमय्यांविरोधात मंत्री अनिल परबांकडून १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल
- ‘सुनील तटकरे आपणही अडगळीत होता’, दरेकरांचे सूचक वक्तव्य
- अजितदादा पूर्ण करा ‘तो’ वादा; एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी!
- १० वी नंतर तीनच वर्षात मिळवा रोजगार; औरंगाबादेत पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची पहिली पसंती!
- ‘उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यापूर्वी भाजपासोबत यावे आणि..’, आठवलेंचे आवाहन


