पुणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने विविध निर्बंध जनतेवर लादले आहेत. राज्यात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवाबाबत देखील अनेक कठोर निर्बंध सरकारने घातले आहेत. राज्यात मंदिरे बंद आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला विरोधक मात्र मंदिरांसह सर्व धर्मीय प्रर्थांस्थळे उघडावीत अशी जोरदार मागणी करत आहेत.
सत्ताधारी केंद्रानेच सांगितलेल्या नियमांचे पालन आम्ही करत आहोत असं सांगत या निर्णयाचे लंगडे समर्थन करत आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधक केंद्र सरकारने फक्त सणवारांना गर्दी होऊ देऊ नका एवढे सांगितले असल्याचे समोर आणून मंदिरे सुरु करण्याची आपली मागणी रेटत आहेत. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले अशा व्यक्तींना दर्शनाची परवानगी ठाकरे सरकार परवानगी का देत नाही असा थेट सवाल फक्त विरोधी पक्षातील नेतेच नव्हे तर सामान्य भाविक आणि जनता देखील आता विचारत आहे.
मंदिरांवर फक्त पुजारीच नव्हे तर ना, रळ,अगरबत्ती, धुप, फुल विकणारेफुलवाले, प्रसादवाले,पूजेच्या साहित्यांचे दुकान चालवणारे, मूर्ती विकणारे यासारख्या अनेक वर्गातील लोकांची देखील उपजीविका चालते. सरकार यांना न कोणती मदत देत आहे ना मंदिरे उघडायला परवानगी यामुळे मोठी नाराजी ठाकरे सरकारच्या विरोधात पाहायला मिळत आहे. अन्य राज्यात मंदिरे सुरु आहेत मग महाराष्ट्रात मंदिरे बंद का असा देखील एक प्रश्न भाविकांकडून केला जात आहे. शासन मंदिरे सुरु करताना जे नियम आखून देईल त्या सर्व नियमांचे पालन करण्याची मंदिर प्रशासन हमी देत असताना देखील सरकार कोणतीही परवानगी देत नसल्याने भाविक मोठे नाराज झाले आहेत.
राज्यात पब, बार, हॉटेल्स, मॉल्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, मेळावे, यात्रा सुरु असताना मंदिरे बंद ठेवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते हे न उलगडणारे कोडे आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. शेख हे काल दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्री १२:३० वाजता पोहचले. यावेळी देखील युवक पदाधिकारी यांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
यावेळी शेख यांच्यासह त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी तोंडाला मास्क सुद्धा लावला नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तरी राष्ट्रवादीचे नेते ऐकणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्रीच जर अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन करत असतील तर सरकारला जनतेला नियम पाळा असे सांगण्याचा अधिकार उरला आहे का हा मुख्य प्रश्न उपस्थित राहणे स्वभाविक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

