Share

लग्न झालं असलं तरीही पूजा सुरक्षित नाही, संबंधित पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं- रुपाली चाकणकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजप खासदार सूनेला मारहाण करत असल्याच्या आरोपानंतर ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न, असा प्रकार घडलाय. भाजप खासदार रामदास तडस यांचे नाव मंगळवारी एकदम चर्चेत आले. त्यानंतर संध्याकाळी नाट्यमरित्या चर्चेला पूर्णविरामही देण्यात आला. या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ व्हायरल करत भाजपवर टीका केली. चाकणकरांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर तडस यांच्या अटकेची मागणी केली त्यानंतर काही तासांनी पंकज तडस यांनी पूजाशी लग्न केले आणि या प्रकरणाला पूर्णविराम दिला. मात्र यावर रुपाली चाकणकर यांनी पूजा सुरक्षित नसल्याचं सांगत पोलीस प्रशासनाला लक्ष देण्यास सांगितले आहे.

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन पुजा यांनी माझ्याशी संपर्क साधला,तिच्यावर दबाव टाकून,बळजबरीने लेखी स्वरूपात,माझ्यावर काहीच अन्याय झाला नाही,सर्व चुकीचे होते,असे लिहून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.तिचा बाहेरील व्यक्तींशी संपर्क सुद्धा बंद होऊ शकतो.लग्न जरी केले असले तरी ती आतासुद्धा सुरक्षित नाही.वर्धा आणि नागपूर पोलीसांकडील केस तिला दबावामुळे मागे घ्यावी लागली.हा दबाव वाढून विपरीत घडू नये.संबंधित पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, असं रुपाली चाकणकरांनी ट्वीट केले आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, ‘मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी विनंत करते’ अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे चाकणकरांनी या प्रकरणाची दखल घेत भाजप खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!