🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. याच प्रश्नी काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राकडे काही मागण्या केल्या असून सर्व सविस्तर माहिती यावेळी राष्ट्रपतींना देण्यात आली.
यानंतर आज(बुधवार) संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारण आक्रमक टीका केली आहे. ‘कोपर्डी बद्दलही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात काही उल्लेख नव्हता. आम्ही कोल्हापुरात आंदोलन केलं, नांदेडमध्ये केलं. लोकांचा आक्रोश आम्ही पाहिला आहे. त्यांचा राग पाहिला आहे. त्यांना कसं आवरलं हे मला माहिती. सरकारला तोडगा काढायचा नाही का?,’ असा सवाल करत संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या तात्काळ मदतीची मागणी देखील केली. ‘मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याचा मी दौरा केला होता. मागच्या वेळचे पैसेही सरकारने दिले नाहीत. त्यांना मदतीची गरज आहे,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
- केंद्र आणि राज्य सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट; शेट्टींचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
