Share

केंद्र आणि राज्य सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट; शेट्टींचा गंभीर आरोप

Published On: 

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचगंगा परिक्रमा केल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आज कोल्हापूरमध्ये पत्रकरांशी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट घालत आहेत. ऊस उत्पादकाला कसं लुटायचं याचं षडयंत्र सुरु आहे. त्याविरोधात आपण आवाज उठवणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी नीती आयोग आणि कृषिमूल्य आयोगावरही टीका केली आहे. ‘आयोग आणि कृषिमूल्य आयोग हे दोन्ही आयोग आता राजकीय भाषणबाजी करत असून हे शेतकऱ्यांसाठी घातक आहेत’, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

एफआरपीचे तुकडे करून पहिला हप्ता 14 दिवसात देण्याच्या कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशी आहेत. असं असताना राज्य सरकारने यात एक महिन्याची मुदत सुचवली आहे. 20 जुलैला हा पत्रव्यवहार झाल्याचा दावा शेट्टी यांनी केलाय. एफआरपीचे तुकडे करण्याविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेट्टी यांनी एक मोबाईल नंबर जाहीर केलाय. या नंबरवर मिस कॉल देऊन ऊस उत्पादकांनी आपला विरोध नोंदवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी शेट्टी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!