🕒 1 min read
औरंगाबाद : मराठवाड्यात आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असून मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरात ढगफुटी झाली. आपदाग्रस्त भागातून अग्निशमन यंत्रणेला नागरिकांचे कॉल वर कॉल येऊन धडकत होते. रेस्क्यू टीम ठिकठिकाणी जाऊन नागरिकांची मदत करत होते. आज बुधवारी दुसऱ्या दिवशी ही कॉल्स कमी झालेले नाही. आजचा दिवस तसेच उद्या दुपारपर्यंत देखील काम सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांनी सांगितले. तसेच पैठण रोडवरील आलाना कंपनी जवळील नाल्यात एक अज्ञात इसम वाहून गेल्याची माहिती देखील विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
धो धो कोसळलेल्या पावसाने शहर जलमय झाले होते. शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. आपदाग्रस्त भागातून नागरिकांच्या मदतीसाठी अग्निशमन दलाला फोनवर फोन धडकले. मात्र विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच वाहनांच्या कमतरतेमुळे वेळीच मदत पोहोचण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. मंगळवारी रात्री साडे सात वाजेपासून अग्निशमन विभागाला कॉल्स येण्यास सुरुवात झाली. यात सर्वाधिक कॉल औरंगपुरा, पैठणगेट, भागातून व्यापारी वर्गाचे कॉल होते. मंगळवार पासून ते बुधवारी सकाळपर्यंत अग्निशमन विभागाला एकूण ५६ कॉल्स आले.
अजूनही कॉल्सचा ओघ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यात पुंडलिक नगर, एन-३, भागातून राहुल इंगळे, शिवछत्रपती कॉलेज समोरुन के. के. दिवेकर, औरंगपुरा भागातील व्यापारी गोपाळ दुशाच, दिवान देवडी, फकिरवाडी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिक नागरिकांचे फोन आले. टिळक पथवरील श्रीमान श्रीमती दुकानासमोरील भिंतीवर एक वृद्ध महिला अडकली होती. रेस्क्यू टीमने भिंतीवर अडकलेल्या या वृद्ध महिलेला सुखरूप खाली उतरवले. रोशन गेट, गोमटेश मार्केट, औषधी भवन, विभागीय आयुक्त कार्यालय, उल्कानगरी, बीड बायपास, सहारा सिटी, मोतीवाला नगर, सहारा पार्क, झांबड इस्टेट, जाधव मंडी या ठिकाणाहून मदतीसाठी फोन आल्याचे अग्निशमन विभागाद्वारे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- पंकज तडस यांच्याविरोधात महिला काँग्रेसने एसपींना दिले निवेदन; कारवाईची केली मागणी
- वाईटाच्या अंताची सुरुवात; भाईजानचा ‘अंतिम’ चे पोस्टर प्रदर्शित
- अहंकार बाजूला ठेवून ‘या’ दोन अपेक्षा पूर्ण कराच ; संजय राऊतांचे भाजपला खुले आव्हान
- सोमय्या-पडळकरांचा ‘तो’ प्लॅन फसला; बारामती दौरा झाला रद्द
- ‘देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांची फसवणूक’, एमआयएम खा.ओवैसींची टीका—
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
