🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्याचे कारण सांगत ठाकरे सरकारने राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत. राज्यातील मंदिरे खुली करण्यावरुन राज्यात मोठे राजकारण सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधक टीका-टिपण्णी करत आहेत. यातच सुरुवातीला भाजपने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केल्यानंतर मनसेने देखील आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या मागणीचा चांगलाच समाचार घेतला असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि केंद्र सरकारने केलेली सूचना याचा दाखला ते देत आहेत. ‘‘आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत,’ असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका कार्यक्रमात केलं होतं.
या विधानाचा आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ”मंदिरं आणि आरोग्य मंदिरं या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता दाखवताहेत. राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा तुमच्या सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सॅनिटायझर वाटप, सॅनिटायझेशन या सगळ्याच्या पुरवठ्यात कट कमिशनची प्रकरण समोर येतायत. त्यावर तुम्ही कधी भाष्य करणार?’ असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला
- एट्रॉसिटी प्रकरण; करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
- केंद्र आणि राज्य सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट; शेट्टींचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
