Share

‘राणेंनी उगाच फुशारक्या मारू नयेत’, विनायक राऊतांचा पलटवार

Published On: 

मुंबई: चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून नवीनच वाद सुरु झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा मुळात अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नयेत असा पलटवार त्यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच गरजेचं नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरूनच विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला गेला. त्यामुळे राणेंनी याचे श्रेय घेऊ नये. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत सकाळी ११ वाजता चर्चा केली. आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. असे स्पष्टीकरण विनायक राऊत यांनी दिले आहे.

दरम्यान यावरच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक महत्त्वपू्र्ण माहिती दिली आहे. ‘आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत माहीत नाही. पण कोणाला बोलवायचं याबाबत अजून प्रस्ताव आलेला नाही’ असे देसाईंनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!