मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर बीसीसीआयने तत्काळ बैठक बोलावुन आयपीएल स्पर्धा स्थगीत करण्याची घोषणा केली. काही दिवसातच उर्वरीत स्पर्धा युएईत आयोजीत करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला.
आयपीएल २०२१ स्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी असताना बीसीसीआयने पुढील आयपीएल स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नवीन संघाचा समावेश करण्यात येणार असुन नवीन संघासाठी बीसीसीआयने मुळ किंमत २००० कोटी रुपये ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल गव्हर्नींग कौन्सीलच्या नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत या संघाची मुळ किमंत ठरवण्यात आली. बैठकीपुर्वी ही किमंत १७०० हजार कोटी इतकी असणार अशी चर्चा सुरु होती.
मात्र बैठकीनंतर ही रक्कम २००० हजार कोटी इतकी ठरवली गेली आहे. जर नवीन संघाची लिलाव प्रक्रिया व्यवस्थीत पार पडली तर बीसीसीआयला तब्बल ५००० कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो. आयपीएल २०२२ मध्ये ७४ सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नवीन संघासाठी अहमदाबाद, पुणे आणि लखनऊ या शहरांची नावे समोर आली आहे. तर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियमची निवड आयपीएल स्पर्धेसाठी होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल
- ‘राज्यात कोरोना लाट येतेय म्हणे, लाट यायला समुद्र आहे काय?’, मनसेचा खोचक टोला
- दरड कोसळली: औट्रम घाटात मदतकार्य सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
