🕒 1 min read
ठाणे : सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाची रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरीही ती पुन्हा वाढू नये या कारणाने गोपाळकाल्याच्या दिवशी(३१ ऑगस्ट)होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला राज्यसरकारने नकार दिला. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंड्या यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु मनसेकडून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलन करीत आहेत. तसेच माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणले की,’ पोलिसांनी आणि राज्य सरकारने कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार. तसेच हे बोगस सरकार आहे, आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते नाही, आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत. जन आशिर्वाद असो किंवा नेत्या मंडळींचे कार्यक्रम होत आहेत मग आम्हाला का बंदी असा तिखट सवाल त्यांनी केला.
दरम्यान, ‘सर्व ठिकाणावरून आम्हाला पाठिंबा येत आहे. उत्तर भारतातून देखील फोन मला आले. राज ठाकरे यांचा आदेश आहे तो आम्ही पाळणार हिंदू म्हणून आम्ही या लोकांनी मतदान केले आता हेच सरकार मागे फिरले असून हिंदूंच्या सणावर गदा आणत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सण होणार दही हंडी करणार, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- डेल्टा विषाणूच्या विरोधात ‘ही’ लस ठरणार गेम चेंजर
- पुढील ३-४ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
- ‘मी काय म्हणतो साहेब CBI प्रमाणेच ED लाही राज्यात तपास कराया बंदी घाला, लैच सालटवत्यात’
- ‘महाविकास आघाडीच्या बेफिकिरीमुळेच ओबीसींचे नुकसान’, खा.प्रीतम मुंडेंचा आरोप
- ‘भाजपा नेतेच कोरोनाचे कॅरिअर, जनतेने त्यांच्यापासून दूर रहावे,’ कॉंग्रेसचा टोला

