Share

‘मी काय म्हणतो साहेब CBI प्रमाणेच ED लाही राज्यात तपास कराया बंदी घाला, लैच सालटवत्यात’

Published On: 

मुंबई : काल सायंकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

परब यांच्यासह शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या देखील ईडीच्या रडारवर आहेत. आजच ईडीने गवळी यांच्या मालमत्तेवर धाड टाकली. या सर्व घडामोडींवरून भाजपवर महाविकास आघाडीतील नेते आरोप करत असून केंद्र सरकारच्या मदतीने ईडीचा गैरवापर केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आता भाजप नेते अवधूत वाघ यांनी रांगडी भाषेत ट्विट करून खिल्ली उडवली आहे.

‘आम्ही काय म्हणतो सायेब, जसं CBI ला राज्यात तपास कराया बंदी घातली तसं या ED च काय करता आलं तर बघा. लैच सालटवत्यात…आपले नम्र – गवळी, राऊत, परब, सरनाईक, देशमुख, खडसे व ईतर,’ असं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!