Share

‘भाजपा नेतेच कोरोनाचे कॅरिअर, जनतेने त्यांच्यापासून दूर रहावे,’ कॉंग्रेसचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करत आहे. पुणे,नाशिक,नागपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून नेत्यांकडून शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. मात्र आता दरम्यान आता यावरूनच कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

शंखासूर भाजपा नेतेच कोरोनाचे कॅरिअर आहेत. त्यामुळे जनतेने त्यांच्यापासूनच दूर राहावे असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी स्वतः चंद्रकांत पाटील मास्क लावत नाहीत. त्यांचे कार्यकर्तेही मास्क लावत नाहीत. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट भाजपने आणली आहे. असे म्हणत त्यांनी पोलिसांनी भाजपवर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच राज्यभरात शंखनाद आंदोलन भाजपकडून केले जात आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे उत्सवांवर बंदी घातली आहे. असे असतानाही भाजपकडून आंदोलन केले जात आहे. तर आता भाजप मोदी यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल करत त्यांनी याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!